सॉलोमन
सॉलोमन : ( इ. स. पू. ९७३ – ९२२ ). प्राचीन इझ्राएलची संयुक्त राज्ये आणि ज्यूडो यांचा श्रेष्ठ राजा. त्याच्या जन्म-मृत्यूच्या तारखा आणि पूर्वायुष्य यांविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. सॉलोमन विषयीची माहिती मुख्यत्वे बायबल च्या ‘ जुना करार’ व‘नवा करार ’ आणि बखरी यांतून मिळते.